सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणारेच आज बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:35 IST2017-10-30T17:34:05+5:302017-10-30T17:35:11+5:30

 माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी खंत

Trying to get the power out today | सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणारेच आज बाहेर

सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणारेच आज बाहेर

ठळक मुद्देधुळ्यात झाला पुस्तक प्रकाशनाचा कार्यकमभाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची उपस्थितीआणीबाणीचा इतिहास तरूणपिढीपर्यंत पोहचला पाहिजे



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आणीबाणीत अनेकांनी संघर्ष केला. त्याचे फळ म्हणून आज केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. मात्र पक्ष वाढीसाठी, सत्ता मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते आज सत्तेबाहेर असून, नुकताच पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे व्यक्त केली.
राजवाडे मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी संपादीत केलेले ‘आणीबाणी - चिंता आणि चिंतनाचा विषय’ तसेच ‘डॉ़ जे़ के़ वाणी स्मृती विशेषांक’ या दोन पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, आॅडीटोरियम हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू उपस्थित होते
एकनाथराव खडसे म्हणाले, आणीबाणीत नागरिकांचे मुलभूत अधिकार हिरावले गेले. देशात पुन्हा लोकशाही रूजावी, नागरिकांना त्यांचे हक्क पुन्हा मिळावेत म्हणून अनेकांनी त्याकाळी संघर्ष केला. आणीबाणी हा स्वातंत्र्यांचा दुसरा लढाच होता. मात्र आजच्या तरूण पिढीला हा इतिहास  माहिती नाही. त्यांच्यापर्यंत तो पोहचला पाहिजे. यासाठी त्याचा पुस्तकांमध्ये समावेश झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


 

Web Title: Trying to get the power out today