भररस्त्यात महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:26 IST2017-04-03T00:26:55+5:302017-04-03T00:26:55+5:30
गोकूळनगरातील एका महिलेस भररस्त्यात मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाºया धुळे येथील विनोद थोरात याच्याविरुद्ध शनिवारी रोबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भररस्त्यात महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
ठाणे : शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून ठाण्याच्या गोकूळनगरातील एका महिलेस भररस्त्यात मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाºया धुळे येथील विनोद थोरात याच्याविरुद्ध शनिवारी रोबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास ही महिला परिसरातील बसथांब्यासमोर उभी होती. त्या वेळी विनोदने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याने आरोपीने तिला शिव्या देऊन मारहाण केली आणि भररस्त्यात तिचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. (प्रतिनिधी)