गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:01+5:302021-01-16T04:40:01+5:30
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदीत गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रकसह ...

गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदीत गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ अंधाराचा फायदा घेऊन ट्रकचालकाने पळ काढला़
थाळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपल्या पथकासह शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली़ त्यावेळी आरजे १४- जीजे ३२७८ या ट्रकवर संशय आल्याने ट्रकला पोलिसांनी थांबवले. पोलिसांना पाहून ट्रकचालक आणि सहचालकाने घटनास्थळावरून पळ काढला़ परिणामी पोलिसांचा संशय अधिकच बळावला़ ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या मागच्या बाजूस ११ लाख ५ हजार रुपये किमतीचे ३६ गुरे ही आखूड दोरीने दाटीवाटीने बांधलेली आढळून आली, तर १० लाख किमतीचा ट्रक असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय जाधव, सिराज खाटीक, आळंदे आदींनी केली आहे.