बाभळे फाट्यावर ट्रक स्कूल बसचा अपघात, ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:14 AM2019-10-17T11:14:21+5:302019-10-17T11:15:05+5:30

मुंबई-आग्रा महामार्ग : सुदेवाने जीवितहानी टळली

Truck school bus mishap at Bhabale Ghat, 2 injured | बाभळे फाट्यावर ट्रक स्कूल बसचा अपघात, ३ जखमी

बाभळे फाट्यावर ट्रक स्कूल बसचा अपघात, ३ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : धुळे येथिल पोद्दार शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया बसला शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे अपघात झाला़ त्यात तीन जण जखमी झाले असून सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले़ त्यानंतर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली़ 
सोनगीर व परिसरातील विद्यार्थ्यांना ने-आण करणारी एमएच ४३ एच ३०८४ क्रमांकाची बस शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याकडून सोनगीरकडे येत असताना अचानक बाभळे औद्योगिक वसाहतीच्या जवळ मुंबई आग्रा महामार्गावर स्कूल बसच्या पुढे चालणाºया ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने स्कूल बस ही ट्रकवर अचानक जावून आदळी़ त्यामुळे या अपघातात बसचालक मदनलाल नारायण गुजर (५२)  बस मध्ये मदतनीस म्हणून असलेल्या गीता दिनेश सोनार (३९) भारती ईश्वर माळी (२९) हे तिघे जखमी झाले आहेत़ दोन विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे़ परिणामी विद्यार्थी भयभीत झाले होते़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ 

Web Title: Truck school bus mishap at Bhabale Ghat, 2 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.