ट्रकमालकांना मिळाले व्यापारी महासंघाचे बळ; वराईच्या विरोधात सर्वांचे एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:33+5:302021-09-10T04:43:33+5:30
या बैठकीत झालेली चर्चा आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केलेली मध्यस्थी यातून अंतिम यशस्वी निर्णय घेण्यात आला. वराई बंदीच्या ...

ट्रकमालकांना मिळाले व्यापारी महासंघाचे बळ; वराईच्या विरोधात सर्वांचे एकमत
या बैठकीत झालेली चर्चा आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केलेली मध्यस्थी यातून अंतिम यशस्वी निर्णय घेण्यात आला. वराई बंदीच्या विरोधात सर्वांचेच एकमत झाले. त्याची घोषणा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी केली.
त्यानुसार १५ सप्टेंबरपासून धुळे शहर, एमआयडीसी परिसरात लोडिंग वराई ट्रक मालकाने द्यावयाची नाही. परंतु अनलोडिंग वराई मात्र द्यावयाची आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.
बैठकीला राजेश गिंदोडिया, कैलास अग्रवाल, संजय अग्रवाल, मनोज अग्रवाल, अजय पसारी, संतोष अग्रवाल, प्रमोद जैन, ईश्वरचंद लोढा, विजय चिंचोले, अजय बरडीया, नवकार ट्रेडर्स, जितेंद्र ट्रेडर्स, सचिन इंडस्ट्रीज, अरुण नावरकर, अमोल सूर्यवंशी, सुनील पाटील, सहदेव चतुर्वेदी, सजी जाॅन, मनोज राघवन, हरीश विभुते, भगवान चाैधरी, सोनू वेडे, नंदू पाटील, हुसैन अन्सारी, सिद्वीन उमरानी, शकील जब्बार, शकील अनीस, नीलेश पाटील, मांगीलाल बापू, रामद्रा मराठे यांच्यासह व्यापारी, कारखानदार, ट्रकमालक उपस्थित होते.
संभाव्य संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने व्यापारी महासंघाने या वादात यशस्वी तोडगा काढला.