शिरपूर जवळील तापी नदीपात्रात पडलेला ट्रक ५० दिवसांपासून पाण्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:00 IST2020-08-10T11:59:41+5:302020-08-10T12:00:01+5:30
ट्रक मालकाचे दुर्लक्ष, ट्रक काढण्यासाठी यंत्रणा नाही

शिरपूर जवळील तापी नदीपात्रात पडलेला ट्रक ५० दिवसांपासून पाण्यातच
आॅनलाइन लोकमत
शिरपूर, जि.धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरून ट्रक पाण्यात पडून ५० दिवस होत आहे़ घटनेच्या दुसऱ्या दिवशीच चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले़ मात्र त्यानंतर संबंधित ट्रक मालकाने अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्यामुळे ट्रक पाण्याबाहेर काढण्याकडे कानाडोळा केला़ दरम्यान, सध्या तापीनदी दुथडी भरून वाहत आहे़ त्यामुळे तो ट्रक अद्यापही पाण्याखालीच आहे़
२० जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरील मेंटल बींब तोडून शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकचे टायर फुटले़ त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पाण्यात बुडाला आहे़ विशेषत: जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातील अत्याधुनिक साधनसामुग्री नसल्यामुळे शोध घेता आलेला नाही़ घटनेच्या दुसºया दिवशी सायंकाळी उशिरा चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले होते़ त्याच दिवशी ट्रक मालक सुध्दा घटनास्थळी दाखल झाला होता़ तेव्हा देखील तापी नदी दुथडी भरून वाहत होती़
घटना घडल्यापासून तापी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पट्टीचे पोहणाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले़ कदाचित केवळ आता गाडीचाच सांगडा शिल्लक राहिलेला असेल, गाडीतील तांदुळ वाहून गेला असेल तसेच गाडी १४ टायरची असल्यामुळे जमिनीत अडकून पडली असावी़ पाणी वाहते असतांना पाण्याचा अधिक जोर आहे़