ट्रक-कु्रझरचा अपघात चौघांना दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:32 IST2018-02-06T11:31:42+5:302018-02-06T11:32:58+5:30
महामार्गावरील घटना : जीवितहानी टळली

ट्रक-कु्रझरचा अपघात चौघांना दुखापत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजिक महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रक आणि कु्रझर यामध्ये अपघात झाला़ त्यात चौघांना दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली़
एमपी ०९ एफए ५६९७ क्रमांकाची कु्रझर मुंबईकडून मध्यप्रदेशाकडे जात असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक असलेल्या हॉटेल नालंदाजवळ समोरुन येणारा एमएच १८ एम १४१९ क्रमांकाचा ट्रक समोरुन येत होता़ या दोघांमध्ये सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला़ कु्रझरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला़ या अपघातात राजू सत्तेलाल बागडी (३०), चेतन नेमीचंद चोरडीया (२३), बाळू गंगाराम वरोद (५०), विजय रामदयाल पटेल (५५) (सर्व रा़ मध्यप्रदेश) यांना दुखापत झाली़ त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अनिल बाबुलाल वाडीया यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल झाला़