अर्थे गावाजवळ ट्रक अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:11 IST2018-03-05T13:11:14+5:302018-03-05T13:11:14+5:30
शिरपूर तालुक्यातील घटना : रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

अर्थे गावाजवळ ट्रक अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अर्थे (ता़ शिरपूर) येथे सकाळी घडली़ घटना लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला़
शिरपूर तालुक्यातील अर्थे गावाजवळ सोमवार दि.५ रोजी सकाळी साडेआठ वाजता समोरुन भरधाव वेगात येणाºया ट्रकने मोटार सायकलला जोरदार धङक दिल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना घङली़ यातील एक मयत हा तालुक्यातील वाघाङी येथील तर एक शहादा येथील आहे़ शिरपूर तालुक्यातील वाघाङी येथुन शहादा जाण्यासाठी तेथील मनोज वसंतराव देवरे (माळी) (वय २८) व दर्शन रामचंद्र महाजन (वय ११) हे जात आसंताना हा अपघात झाला अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली़