आदिवासींनी निसर्ग जपण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:08+5:302021-08-24T04:40:08+5:30
झेड.बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व आदिवासी विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण संघ ...

आदिवासींनी निसर्ग जपण्याचे काम केले
झेड.बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व आदिवासी विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण संघ संचालित प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील प्रा.डॉ. ए.टी. पाडवी यांचे ‘सातपुड्यातील आदिवासी जीवन’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. पवार होते. या वेळी उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, डॉ. डी.के. पाटील, डॉ. वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ. ए.टी. पाडवी पुढे म्हणाले, आदिवासी समाजाच्या जीवनपद्धती निसर्गाशी जुळलेल्या आहेत. सातपुडा परिसरातील आदिवासी समाजाची एक विशिष्ट जीवनशैली असून, आदिवासी नृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. निसर्गाशी नाते जपताना सुरुवातीपासून आरोग्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, निसर्गोपचार व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करणे अशा विविध विषयांवर त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. समाजात मुले व मुली यांच्यात समानता असून त्यांचे गुणोत्तर अधिक आहे.
प्राचार्य डॉ. पी.एच. पवार म्हणाले, आदिवासी संस्कृती, रूढी-परंपरा व उत्सव हे वेगळे असून, आजच्या काळात स्वीकारण्याजोगे आहेत.
सूत्रसंचालन डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आदिवासी विद्यार्थी विकास समितीचे संयोजक डॉ. स्वप्निल पाडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी.एस. गिरासे, डॉ. योगिता पाटील व डॉ. वैजनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.