ढोलाच्या तालावर आदिवासींचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:56 IST2020-03-05T11:55:43+5:302020-03-05T11:56:14+5:30
दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल; आज बोराडी येथे भरणार ‘भोंगऱ्या’

ढोलाच्या तालावर आदिवासींचा कलाविष्कार
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (धुळे) : मोठ्या ढोलांच्या निनादात कोडीद व दहिवद (ता. शिरपूर) येथे आयोजित भोंगºया बाजारात आदिवासी बांधवांनी एकापेक्षा एक कलाविष्कार सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उत्सवात सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी असल्यामुळे १५ ते २० लाखांची उलाढाल झाली. दरम्यान, गुरुवारी भोंगºया बाजार बोराडी येथे भरणार आहे.
४ रोजी म्हणजे बुधवारी कोडीद गावाचा आठवडा बाजाराचा दिवस असतो. त्यादिवशी हा भोंगºया बाजार भरला़ गुलाल उधळून या उत्सवाला भर दुपारच्या सुमारास जल्लोषात साजरा करण्यात आला़ सरहद्दलगत कोडीद गाव असून तेथील बाजारपेठ सर्वात मोठी असल्यामुळे भोंगºयानिमित्त हजारो आदिवासींनी गर्दी केली होती़ याशिवाय तालुक्यातील दहिवद, पनाखेड व खंबाळे येथे झालेल्या भोंगºया बाजारात देखील गर्दी होती़
पारंपारिक वेशभूषेत दाखल झालेल्या आदिवासी समाजबंधव रंगीबेरंगी वस्त्रे, चांदीचे दागिने, मोरपिसांची टोप, कंबरेला बांधवयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, अणि वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करुन आले होते़ तर दुसरीकडे ढोल, मांदल, थाळी, बासरी, आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर लहान मुलांपासून तर वृध्दांपर्यंत पावरा नृत्यावर नाचतांना दिसलेत़ विशेषत: महिलांची पारंपारिक वाद्यांच्या तालावर पाऊले थिरकली होती़
आदिवासी बांधवांनी गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. बाजारामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. भोंगºया बाजार पाहाण्यासाठी खास बाहेरगावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली़
दरम्यान भोंगºया बाजारानिमित्त आदिवासी समाजात उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. अजून पाच दिवस विविध ठिकाणी हा उत्सव बघण्यास मिळणार आहे. या बााजरातून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान या बाजारात दागिन्यांसह विविध संसारपयोगी वस्तूंची खरेदी करण्यात येत आहे.बाजारामुळे परिसरातील समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे.