शिरपुरात आदिवासी व क्रांती दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:12+5:302021-08-12T04:41:12+5:30
शिरपूर : येथील आर. सी़. पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन ...

शिरपुरात आदिवासी व क्रांती दिन साजरा
शिरपूर : येथील आर. सी़. पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी के. एम. सनेर, मुख्याध्यापक बी. बी. सोनवणे यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून विविध औषधी वनस्पती तसेच फळवर्गीय वनस्पती यांची रोपे शालेय परिसरामध्ये लावण्यात आली. सूत्रसंचालन बी. एन. पेंढारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. एच. पाटील यांनी केले़
शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस.पी.डी.एम. वरिष्ठ व डॉ. पां. रा. घोगरे कनिष्ठ महाविद्यालयात ९ ऑगस्ट या क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवसानिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व ऑनलाईन वेबिनार असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण विभाग रासेयो या विभागातर्फे क्रांती दिनानिमित्त थोर स्वातंत्र्य सैनिक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर व्यंकटराव रणधीर, क्रांतिवीर ख्वाजा नाईक, तंट्या भिल, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. वसावे यांनी क्रांतीकारकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. यानिमित्ताने वड या वृक्षाचे रोपण करण्यात आले. स्व. प्राचार्य डॉ. विजयराव रंधे यांच्या स्मृती स्थळावर माल्यार्पण करण्यात आले. शहीद वृक्षाला माल्यार्पण करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
उमवी जळगाव व विद्यार्थी कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळातील आदिवासींचे सामाजिक जीवन या विषयावरील वेबिनारमध्ये विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे डॉ. राज विरेंद्र गावीत यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त व कुलसचिव रोहित रंधे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. एफ. एम. बागुल, प्रा. पी. जी. पारधी, प्रा. एस. टी. ठाकरे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. सुरेंद्र कांबळे, डॉ. डी़. एल. पावरा आदी उपस्थित होते.
शिरपूर : येथील आर. सी़. पटेल कला महिला महाविद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन इतिहास विभाग व विद्यार्थी विकास विभागामार्फत साजरा करण्यात आला. क्रांतिकारक व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ. शारदा शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ़. एच. आर. चौधरी, प्रा. आय. आय. परदेशी, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. एल. झेड. पाटील उपस्थित होते.
शिरपूर : शहरातील रामसिंग नगरातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत विश्व आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. विश्व आदिवासी दिन व क्रांती दिनाचे महत्त्व शाळेचे शिक्षक जे. के. सोलंकी यांनी सांगितले. मुख्याध्यापक आर. टी. भोई यांनी ज्येष्ठ शिक्षिका सुशीला सुकलाल पावरा यांचा सत्कार केला. त्यांनी आदिवासी संस्कृती, सण, उत्सव, परंपरा या विषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एच. एम. मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.एस.ईशी, व्ही. के.सोनवणे, डी. एम. महाजन, पी. ए. सोनवणे, आर. आर. चौधरी, एन.आय.राजपूत, के. आर. अलकारी पी. व्ही. जगदेव आदी उपस्थित होते़
बभळाज : येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात क्रांती दिन व विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एस.ए.कुरेशी व सरपंच जगन्नाथ महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करून ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन आर. पी. जोशी यांनी तर आभार शरद पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर. यु. चौधरी, के. एल. पाटील, जान्हवी पाटील, वानखेडे, आर.ए.माळी उपस्थित होते़
शिरपूर : शहरातील आर. सी. पटेल मराठी माध्यमिक विद्यालयात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन प्राचार्य पी. व्ही. पाटील व एस.डी गाडीलोहार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधून क्रांतीदिनाचे व जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. ऑनलाईन गीतगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्रांतीदिनावर तसेच आदिवासी दिनावर विविध उत्कृष्ट गाणी सादर केली. सूत्रसंचालन ए. बी. वाल्हे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. एन. मोरे, वाय. व्ही. कोठावदे, सपकाळे, एन. के. देवरे, ए. एम. सोनार यांचे सहकार्य लाभले.
असली : येथील आर. सी. पटेल अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला मुख्याध्यापक आर. एस. कुळकर्णी यांनी आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन केले. भावना पाटील यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. इयत्ता ४ थी ते ७ वीतील विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात फत्तेपूर, दुर्बळया, दोंदवाडा आदी गावातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत दोंदवाडा येथील ग्रुपने प्रथम क्रमांक तर फतेपूर ग्रुपने व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.एच.पाटील, जे.पी.मोते, बी.एच.धाकड, एन.आर. कोळी, जे.पी.सोनवणे यांनी सहकार्य केले़
शिरपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघात क्रांती दिनानिमित्त क्रांतीवीरांना वंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. उत्तमराव पाटील व लिलाताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष अनील पाटील, डॉ. लखीचंद पाटील, भरत राजपूत, कार्याध्यक्ष एम. क़े. भामरे यांनी क्रांतिकारकांच्या कार्याविषयी माहीती सांगितली़. क्रांती वीरांगणा लिलाताई यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका त्यांचे सुपुत्र अनिल पाटील यांच्याकडून सदस्यांना देण्यात आली. यावेळी अशोक अग्रवाल, मधुकर पाटील, सोमा भामरे, अर्जुन चौधरी, किशोर दलाल, मकडु भोई आदी उपस्थित होते़
खर्दे : येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात क्रांती दिनानिमित्त गीतगायन स्पर्धा घेण्यात आली़. प्राचार्य पी. आर. साळुंखे यांनी देशभक्त व क्रांतिकारक यांचा इतिहास मांडून क्रांतिकारक प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. एकूण २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम पूजा विनोद पारधी, द्वितीय कार्तिक कन्हैया महाजन, तृतीय सुनिता रवींद्र चौधरी व उन्नती रवींद्र खोंडे हे यशस्वी झाले. स्पर्धेचे परीक्षण एस. जे. सूर्यवंशी, एस.आर. निकम यांनी केले. सूत्रसंचालन एस. आर. जाधव यांनी तर आभार अमोल सोनवणे यांनी मानले. ए.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्त्व पटवून दिले.
शिरपूर : शहरातील एच. आर. पटेल कन्या मराठी माध्यमिक विद्यालयात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिवस प्राचार्य आर. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यवेक्षक जे. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. कोरोना कालावधीत प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी ऑनलाइन व्हिडिओ तयार केले. गीतगायन स्पर्धेच्या व्हिडिओचे परीक्षण एस. जे. भामरे यांनी केले. स्पर्धेत प्रथम योगाक्षी राहुलसिंग परदेशी, द्वितीय आयुषी सुधाकर वळवी, तृतीय वैष्णवी प्रमोद पवार, आकांक्षा विजय सोनवणे, उत्तेजनार्थ प्रणाली विलास पाटील, रूपाली संतोष तोक्शा या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.जे.भामरे, एम.डी.पाकळे यांनी व्हिडिओ तयार करण्याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
फोटो- मेल वर पाठविले आहेत़़़़