लळिंग किल्ल्यावर साकारला धुळेकरांसाठी ट्रेकिंग पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:13+5:302021-07-31T04:36:13+5:30
यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा धुळे जिल्हाप्रमुख अॅड. पंकज गोरे, वनविभागाचे डी. डब्ल्यू. पवार , उपवन संरक्षक अधिकारी माणिक ...

लळिंग किल्ल्यावर साकारला धुळेकरांसाठी ट्रेकिंग पार्क
यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा धुळे जिल्हाप्रमुख अॅड. पंकज गोरे, वनविभागाचे डी. डब्ल्यू. पवार , उपवन संरक्षक अधिकारी माणिक भोसले उपस्थित होते.
लळिंग किल्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या दोन डोंगरामध्ये श्री शंकर भगवान यांची २५२ फूट भव्य मूर्ती बसविली जाणार आहे. तसेच मूर्तीवर लेसर लाइट शो, डोंगराच्या परिसरातील दीड हजार एकर जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन, रॉक गार्डन, बर्ड गार्डन, कॅक्टस गार्डन, जंगल फेरी, फ्लाॅवर / रोझ गार्डन, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय, रेस्क्यू सेन्टर, मिनी ५ डी थिएटर (ज्यात जंगलामधील वेगवेगळ्या प्राणी - पक्षी व पाण्याचे धबधब्याचे आवाज यांचा शो दाखवले जातील.) लहान मुलांसाठी खेळणी, ऐतिहासिक वास्तूंचे देखावे आदींचा समावेश जंगल फेरी पार्क मध्ये राहणार आहे. या संदर्भात पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन जंगल फेरी पार्क प्रेझेंटेशन करून यासाठी निधीची मागणी केली जाणार आहे.
लळिंग कुरण परिसरात बिबट्या, तरस, काळवीट, ससा, मोर, लांडोर, हरिण असे वन्यप्राणी तसेच वन्य पक्षांचा वास आहे. या लळिंग जंगलाचा सर्वांगीण विकास व्हावा, या परिसरात रस्ते, पाणवठे निर्माण करण्याबरोबर वृक्ष लागवड करत परिसर अधिकाधिक समृद्ध करत, पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊन उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे जंगल फेरी पार्क उभे करून धुळ्याचा विकास होण्याचा मानस युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे यांचा आहे.
जंगल फेरी पार्कची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात यावी, यासाठी १४ मार्चला लळिंग जंगलात पाहणी केली होती. धुळेकर बांधवांना पायी फिरून, सायकल ट्रेकिंगचा आनंद घेता यावा यासाठी जंगल ट्रेकिंग सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून ट्रेकिंग सुरू राहणार आहे. ट्रेकिंग दरम्यान धुळेकर बांधवांनी वृक्ष लावणे, पाणी टाकणे, वृक्ष दत्तक घेणे, धुळेकर बांधवांकडून शक्य होईल ते योगदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.