जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षदिंडीचे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:26 IST2019-07-30T21:25:14+5:302019-07-30T21:26:30+5:30
शाळांनी केले आयोजन: विद्यार्थ्यांनी विविध घोषणांचे फलक हातात घेऊन केली जनजागृती, उपक्रमाचे गावकयांनी केले कौतुक

लामकानी येथे काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत सहभागी झालेले शिक्षक, विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांतर्फे वृक्षदिंडी काढण्यात येऊन वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली. या वृक्षदिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते.
मंडलिक विद्या मंदिर,धुळे
श्री मयूर शैक्षणिक ट्रस्ट संचलित मंडलिक विद्यालयातर्फे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून, वृक्ष लागवडीबाबत घोषणा देवून जनजागृती केली. वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी.टी.देसले, उपाध्यक्ष डी.डी. पाटील, मुख्याध्यापिका विजया मोरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
*लामकानी*
तालुक्यातील लामकानी येथील जिल्हा परिषद मुले, कन्या, जि.प. उर्दू शाळा तसेच म.सु.पाकळे माध्यमिक विद्यालय लामकानी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. सुरवातीला वृक्षदिंडीचे उदघाटन मेहेरगाव केंद्रप्रमुख छाया खैरनार व संस्थेचे चेअरमन पुरूषोत्तम पाकळे यांनी केले. या दिंडीत जिल्हा परिषदेचे ४५० व पाकळे विद्यालयाचे एक हजार असे एकूण जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोषाख करून गावातून वृक्षदिंडी काढली. ‘एक मुल एक झाड, झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली.
वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनील सोंजे, जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विजया सोंजे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान अन्सारी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकुंभे, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
*मुकटी*
येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जिभाऊ पोपटराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पोपटराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आमदार कुणाल पाटील यांच्याहस्ते झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गुलाबराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मधुकर गर्दे, नगराज पाटील, व्हा. चेअरमन भटुलाल शर्मा, सुभाष चौधरी, बाजीराव पाटील, भगवान चौधरी, हर्षल साळुंखे, व्ही.एन. सैंदाणे उपस्थित होते. सजविलेल्या पालखीत वृक्ष ठेवून सवाद्य मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाबाबत जनजागृती केली. प्राचार्य ईश्वर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. एम.डी. पवार यांनी केले.