पिंपळनेरला स्वातंत्र्यसैनिक बोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:18+5:302021-06-09T04:44:18+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सुधाकर पंडित पाटील होते. स्वातंत्र्यसैनिक कमलाकर शंकर बोळे यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक प्रा. एच. पी. ...

पिंपळनेरला स्वातंत्र्यसैनिक बोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सुधाकर पंडित पाटील होते. स्वातंत्र्यसैनिक कमलाकर शंकर बोळे यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक प्रा. एच. पी. शेटे यांनी केला. सत्काराला उत्तर देताना स्वातंत्र्यसैनिक बोळे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणातून प्रगती करा, त्यांना वेळप्रसंगी मदत करा. शिक्षण हे अमृत आहे. ते देण्याची ताकद शिक्षकांमध्ये असल्याने हे ज्ञान गंगेचे पवित्र मंदिर असून याचा उद्धार करीत राहा. यावेळी संचालक विनायक शिंदे, महेंद्र गांगुर्डे, शामकांत शिरसाठ, सुभाष जगताप, एकनाथ कोठावदे, सुभाष गांगुर्डे, उत्तम माळी, राजेंद्र देशमुख, सुधाकर पाटील, गुलाब गवळे, संजय नेरकर, रामचंद्र पाटील, चंद्रकला पाटील, हेमलता शिंदे, मुख्याध्यापक बी. एल. चव्हाण, उपमुख्याध्यापक यु. जे. पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक उपशिक्षक सचिन जाधव व प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक बी. एल. चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन यु. जे.पाटील यांनी मानले.