मालपूर येथे वृक्षारोपण, दिंडीतून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:30 IST2019-07-28T22:30:07+5:302019-07-28T22:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : येथील स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पुज्य साने गुरुजी खाजगी ...

मालपूर येथे वृक्षारोपण, दिंडीतून जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : येथील स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पुज्य साने गुरुजी खाजगी प्राथमिक शाळेत २७ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच भारती माळी ग्रा.पं. सदस्य संतोष कोळी, अरुण धनगर, तुकाराम माळी, समाधान धनगर, मुख्याध्यापक व्ही.डी. कागणे, उपमुख्याध्यापक आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी. सुर्यवंशी आदींच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दोन विद्यार्थी मिळून एक झाड दत्तक देण्यात आले असून जगविलेल्या झाडासोबत पुढीलवर्षी छायाचित्र काढून ग्रा.पं. सदस्य जगदीश खंडेराय हे पाचशे रुपयाचे पारितोषिक देणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमासाठी शिक्षक सुभाष ठाकरे, बी.बी. मराठे, के.बी. पाटील, साहेबराव ठाकरे, एस.पी. भावसार, आर.एस. गिरासे, एस.व्ही. सोनवणे, पी.एन. निकम, बी.आर. पटेल, वाय.जी. खैरनार, आर.एस. लिंगायत, के.डी. पवार, शिक्षिका आर.आर. राजपूत, एस.पी. भावे, पी.बी. चौधरी, भावना पाटील, जयश्री गोसावी, मुख्याध्यापक वंजारी, रणजित राजपूत, जया बागुल. आननसिंग गिरासे, लक्ष्मण पानपाटील, दिलराज ठाकरे, छोटु राजपूत, बावा गोसावी, ग्रंथपाल प्रमोद राजपूत. आदिंनी परिश्रम घेतले.