शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

जमीन शक्तिशाली बनण्यासाठी वृक्षलागवड गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:55 IST

बाळासाहेब इंगोले : शाश्वत योग शेती विषयावर साक्री येथे आयोजित व्याख्यानात प्रतिपादन

साक्री : आज आधुनिक युगात रासायनिकतेचा वापर आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वनस्पतींमधील पोषण व्यवस्थे संबंधातील समस्या वाढू लागली आहे. याचे कारण जमीन शक्तिहीन झालेली आहे. अशा परिस्थितीत शक्तिहीन जमिनीला शक्तिशाली बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड गरजेची असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब इंगोले यांनी शुक्रवारी येथे केले.शहरातील अंबापुर रोडलगत असणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत योग शेती या विषयावर व्याख्यान आणि योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका अ‍ॅड.पूनम शिंदे-काकुस्ते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब इंगोले कोल्हापूर, नेत्ररोग तज्ञ मल्हार देशपांडे मालेगाव, प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. शिंदे-काकुस्ते, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख प्रचारक शीला दिदी उपस्थित होते.तालुक्यासह शहरातील बहुतांश साधक, साधिका शेतीशी संबंधित असल्याने योग केवळ मानवी शरीरालाच बरे करतो असे नव्हे, तर तो शेतातील पिकांनाही रोगराईमुक्त ठेवण्यात योगदान देतो. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी असणाºया योगाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शीला दीदी म्हणाल्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडे तालुकाभरातून रोज साधक येतात. मात्र गेल्या अनेक वर्र्षांपासून शहरातून अंबापुर गावाकडे जाणाºया या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली होती. मागणी करूनही प्रश्न निकाली निघत नव्हता. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून नागरिकांसह साधकांना आणि अंबापूरच्या ग्रामस्थांना रस्त्याची सोय करून दिल्याबद्दल प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. शिंदे- काकुस्ते यांचा शीला दीदी यांनी सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ मल्हार देशपांडे यांनीही योगाचे महत्व विशद करीत प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमासाठी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे