कर्नाटकधील म्युकरमायकोसिस रुग्णावर जवाहरमध्ये उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:39+5:302021-07-04T04:24:39+5:30

गुलबर्गा येथील श्रीकांत पल्ला यांना म्युकरमायकोसिस आजाराने गाठले. काळया बुरशीमुळे त्यांच्या सायनसजवळ, तसेच दातांच्या काही भागावर इन्फेक्शन झाले होते. ...

Treatment in Jawahar on a patient with myocardial infarction in Karnataka | कर्नाटकधील म्युकरमायकोसिस रुग्णावर जवाहरमध्ये उपचार

कर्नाटकधील म्युकरमायकोसिस रुग्णावर जवाहरमध्ये उपचार

गुलबर्गा येथील श्रीकांत पल्ला यांना म्युकरमायकोसिस आजाराने गाठले. काळया बुरशीमुळे त्यांच्या सायनसजवळ, तसेच दातांच्या काही भागावर इन्फेक्शन झाले होते. धुळ्यात एसीपीएम मेडिकल कॉलेजच्या म्युकरमायकोसिस विभागात यशस्वी उपचार होत असल्याची माहिती त्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाली. त्यानंतर श्रीकांत पल्ला आपल्या नातेवाइकांसोबत धुळ्यातील एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर डेंटल कॉलेजच्या ओरल मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभागातील डॉ. शरण बसप्पा यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत बुरशीजन्य भाग काढून टाकला. सध्या त्यांची तब्येत ठीक असून, ते आता आयसीयूत विश्रांती घेत आहेत.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. बी.एम. रुडगी, डॉ. मनोजकुमार कोल्हे यांच्यासह डॉ. भावेश, डॉ. विनायक, डॉ. प्राची यांनी सहकार्य केले. डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील, संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Treatment in Jawahar on a patient with myocardial infarction in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.