मनपा शाळेच्या ओपीडीतुन होणार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:36 IST2020-05-01T20:16:57+5:302020-05-01T20:36:07+5:30

सर्वसामान्य रुग्णांना दिलासा

Treatment to be obtained from OPD of Municipal School | मनपा शाळेच्या ओपीडीतुन होणार रुग्णांवर उपचार

Dhule

धुळे: कोरोनाच्या पार्वभूमीवर शहरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, प्रत्येक नागरिकाला प्रभागात वैद्यकीय सुविधा मिळावी या उद्देशाने आज १ मे रोजी स्वामी टेऊराम हायस्कूल, साक्रीरोड येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, आयएमाएचे अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांचे उपस्थितीत होते. मनपामार्फत सर्वसामान्य आजारावरील रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच
कोरोना संदर्भातील लक्षणांची प्राथमिक तपासणी केली जावी या उददेशाने शहरातील विविध भागात असलेल्या मनपा शाळांच्या जागेत २० ठिकाणी ओपीडी सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी शहरातील निमा, युनानी मेडीकल असोसिएशन व महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशन या संस्थेच्या वैद्यकीय अधिकान्यांनी यासाठी सहकार्य देणेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. त्याअनुषंगाने आज प्रायोगिक तत्वावर प्रथम टप्यात स्वामी टेऊराम हायस्कुल, साक्रीरोड येथे ओपीडी सुरु करण्यात आली. स्वामी टेऊराम हायस्कुललगत संमिश्र समाजाची नागरीकांची वस्ती मोठया प्रमाणावर आहे. तसेच समोरील भागात गरीब व अल्पशिक्षीत कष्टकरी नागरीकांची वस्तीही मोठया प्रमाणावर आहे. प्रायोगिक तत्वावर आजपासुन ओपीडी सुरु करण्यात आलेली आहे.

Web Title: Treatment to be obtained from OPD of Municipal School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे