जिल्हा रुग्णालयात केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST2021-03-23T04:38:28+5:302021-03-23T04:38:28+5:30

जिल्ह्यासह महानगरात कोरोनाबाधितांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा ...

Treat only critically ill patients at the district hospital | जिल्हा रुग्णालयात केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करा

जिल्हा रुग्णालयात केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करा

जिल्ह्यासह महानगरात कोरोनाबाधितांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जात आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइनची सुविधा असल्याने ज्या बाधितांची ऑक्सिजनची आवश्यकता नाही. अशांना उपचारासाठी दाखल केले जात आहे. वास्तविक ज्या बाधितांची ऑक्सिजनची सुविधेची आवश्यकता आहे. अशा बाधितांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची गरज आहे.

प्रशासनाने साैम्य लक्षणे असलेल्या बाधितांची मनपाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात यावे, जेणेकरून गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकतात. प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी समाजवादीचे शहर अध्यक्ष अमीन पटेल, गुलाम कुरेशी, रशीद शाह, नेहाल अन्सारी, मुनवर अन्सारी आदी उपस्थित होते.

Web Title: Treat only critically ill patients at the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.