राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबई पुण्याकडे सर्वाधिक मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:11+5:302021-08-20T04:42:11+5:30
कोरोना असल्यामुळे बससेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. सर्व बसेस या जागेवरच उभ्या होत्या. आता ही परिस्थिती कमी होत ...

राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबई पुण्याकडे सर्वाधिक मागणी
कोरोना असल्यामुळे बससेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. सर्व बसेस या जागेवरच उभ्या होत्या. आता ही परिस्थिती कमी होत असल्याने ट्रॅव्हल्स या पूर्वपदावर येत आहेत. नेहमी प्रमाणे बसेस आता मुंबई, पुणे, नागपूर या मार्गावर धावू लागल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात खासगी बसेला मागणी वाढतीच आहे. डिझेलच्या भावात वाढ झाल्याने सरासरी ५० रुपयांनी ट्रॅव्हल्सचे दर वाढले असल्याचे ट्रॅव्हल्स संघटनेचे पदाधिकारी गोविंद ठाकरे यांनी सांगितले.
ट्रॅव्हल्सची संख्या घटली
- कोरोना असल्यामुळे ट्रॅव्हल्स आता पूर्वपदावर येत आहेत. असे असले तरी पूर्ण क्षमतेने या बसेस महामार्गावर धावत नसल्याचे सांगण्यात आले. ६० टक्के बसेस या धावत असून ४० टक्के बसेस या जागेवरच उभ्या आहेत.
- मागील वर्षी डिझेलचा दर हा ६५ रुपये लिटर इतका होता. आजच्या स्थितीत डिझेलचा दर ९६ ते ९७ रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यात पुन्हा वेगवेगळ्या करात देखील वाढ झालेली असल्याचे सांगण्यात आले.
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. टॅक्स वाढलेले आहेत. ४० टक्के बसेस या जागेवरच उभ्या आहेत. ग्राहकांचा अजूनही अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. शासनाने कर माफ करावा. सर्व महाग झाल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने कर माफ करुन दिलासा द्यावा.
गोविंद ठाकरे, ट्रॅव्हल्स संघटनेचे पदाधिकारी
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ
मार्ग आधीचे भाडे आता
धुळे ते पुणे ६५० ७००
धुळे ते मुंबई ६५० ७००
धुळे ते नागपूर ७५० ८००