प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान द्यावे -डॉ. हर्षद लांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:44+5:302021-07-17T04:27:44+5:30

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आयोजित निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या डॉ. ...

Trainee doctors should contribute for the eradication of tuberculosis -Dr. Harshad Lande | प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान द्यावे -डॉ. हर्षद लांडे

प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान द्यावे -डॉ. हर्षद लांडे

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आयोजित निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. मनीष पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पवार, श्वसनविकार विभागप्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. लांडे यांनी जागतिक आरोग्य संघटना क्षयराेग रोग नियंत्रणासाठी राबवीत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी क्षयरोगाचे निदान कसे करावे, त्यावरील उपचार नेमके कसे करावेत, याविषयी विस्तृत माहिती दिली. क्षयरोग निर्मूलनाची मोठी गरज असून, आजही अनेक जण क्षयरोगासोबत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी प्रत्येक डॉक्टरनी उपचार पद्धती शिकून घ्याव्यात, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Trainee doctors should contribute for the eradication of tuberculosis -Dr. Harshad Lande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.