शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड विभागाचे काम केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 16:15 IST2021-01-21T16:15:30+5:302021-01-21T16:15:39+5:30

धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ...

The trainee doctors of the government medical college closed the work of Kovid department | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड विभागाचे काम केले बंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड विभागाचे काम केले बंद

धुळे : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोरोना काळात अहोरात्र रुग्ण सेवा केली आहे. मात्र त्यांना त्यासाठीचा अतिरिक्त भत्ता न मिळाल्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ५० डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार पासून डॉक्टरांनी कोविड विभागातील काम बंद केले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत होती. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आंतर्वासीता करीत असलेल्या डॉक्टरांनी कोरोना काळात कोविड विभागात सेवा दिली होती. त्यासाठी त्यांना अतिरिक्त भत्ता देणार असल्याची घोषणा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.
मात्र नुकताच अतिरिक्त बत्त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडून फेटाळण्यात आला असल्याने अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
संघटनेचा दावा - संघटनेने दावा केला आहे कि, २२ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याउलट अर्थ मंत्रालयाने अतिरिक्त भत्ता देण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या अस्मी या संघटनेने दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजावर या डॉक्टरांच्या संपामुळे परिणाम झाल्याचा जाणवतो. शासनाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या आवश्यक त्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.

Web Title: The trainee doctors of the government medical college closed the work of Kovid department