रेल्वे गेट २५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:41 IST2020-02-12T20:40:40+5:302020-02-12T20:41:10+5:30
धांदरणे : ऐन बारावी परीक्षेच्या कालावधीत व्यत्यय, नाराजीचा सूर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धांदरणे : शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे ते होळ दरम्यान येणारे रेल्वे गेट ५ फेब्रुवारीपासून बंद झाले आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत हे गेट बंद राहणार आहे. ऐन बारावी परीक्षेच्या कालावधीत रेल्वे गेट बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामस्थांना बाजारपेठ, दवाखाना, कार्यालयीन कामकाज आदी कामांसाठी यावेच लागते. तसेच सर्वात जास्त विद्यार्थी संख्या शिंदखेड्यात आहे. हायस्कूलपासून महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिंदखेडा येथे डाबली, धांदरणे, गोराणे, विटाई येथील विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करावी लागते. आता बारावीची मौखिक परीक्षा सुरु आहे. १८ तारखेपासून बारावी बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार आहे. मात्र, रेल्वे गेट बंद असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस नरडाणा पिंप्राड मार्गे धांदरणे येथे पाठवावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.