शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

दिवसात ३५ वेळा असते ‘रेल्वे फाटक’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:56 AM

दोंडाईचा रेल्वे स्टेशन : शहराजवळील रेल्वे फाटकवर उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची मागणी 

दोंडाईचा :     सुरत - भुसावल पश्चिम रेल्वे मार्गावरील दोंडाईचा  रेल्वे स्टेशनचे  दोन्ही रेल्वेफाटक प्रवाशी तसेच मालवाहतूक गाड्याचा ये - जा मुळे वारंवार बंद केले जात असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. साधारणत: दिवसातून ३५ वेळेस फाटक बंद  होत असल्याने वाहनधारकासाठी रेल्वे फाटक डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जाते.  याठिकाणी उड्डाण पुल उभारण्याची मागणी परिसरात राहणाºया नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.  या रेल्वे मार्गावर गर्ल्स स्कूल जवळ व शहराचा बाहेर दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्यावर असे दोन रेल्वे फाटक आहे. गर्ल्स स्कूल जवळील              गेट चा उत्तरेला सिंधी  बांधवांसह, डालडा घरकुल आहे. त्यामुळे  येणाºया जाणाºयाची नेहमी  वर्दळ असते. याच रेल्वेमार्गावर दोंडाईचा नजीक दोंडाईचा -शिंदखेडा रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. रेल्वेचा ये - जा सुरु असल्याने रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. दिवसात ३५ वेळा बंदसुरत - भुसावळ रेल्वे मार्गावरुन दररोज ३५ रेल्वे जातात. म्हणजेच दिवसातून ३५ वेळा हे रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे रेल्वे फाटकाच्या पलिकडे राहणाºया नागरिकांना याचा त्रास होतो. नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. दररोजच्या या त्रासाला नागरिक कंटाळले आहे. याठिकाणी उड्डाणपूल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्ष पासूनची मागणी अजूनही प्रलंबितच                   आहे. याकडे कोणीच आजपर्यंत गांभीर्याने बघितले आहे, असे वाटत नाही.रेल्वे प्रशासनाने याकडे आतातरी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. कारण आता शहरातील लोकसंख्या वाढत आहे. या रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे आतातरी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Dhuleधुळे