पायपीट करून आलेल्या नागरिकांना अल्पोहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:11 IST2020-03-30T22:10:22+5:302020-03-30T22:11:03+5:30
कोरोनोचे संकट : मुंबई आग्रा महामार्गावरून आलेल्या नागरिकांना मदतीचा हात

dhule
धुळे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय व स्थानिक मजूर सुमारे पाचशे ते हजार किलोमीटर पायपीट करून मजूर गावाकडे जात आहे़ महामार्गावरील हॉटेल बंद असल्याने त्यांना मदतीचा हात म्हणून अल्पोहार दिला जात आहे़
सूर्यमुखी मारूती मंडळ, अलंकार सोसायटी यांच्यामार्फत पारोळा चौफुली, चाळीसगाव रोड चौफुली येथे सकाळी व रात्री अशा स्थलांतरीत परप्रांतीय नागरिकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ तीन दिवसापासून हा उपक्रम सुरु आहे़ आपत्कालीन परिस्थितीत मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेतला आहे़ या उपक्रमात सर्व परिसरातील युवक मोठ्या हिरीरीने सहभाग घेत आहे़ यासाठी किशोर दहिवडकर मनीष साळुंखे, मधु चौधरी, विकी चौधरी, सागर निकम, गोपाल पाटील, गुलाब येलमामे, शिरीष देवरे तसेच नागरिक सहभागी झाले आहेत़