शंभरफुटी रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:30+5:302021-01-23T04:36:30+5:30
नागरिकांना करावी लागते साफसफाई मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दत्त मंदिराजवळील गटारी तुडुंब भरल्याने येथील महिलांनी हातात पावडी ...

शंभरफुटी रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी
नागरिकांना करावी लागते साफसफाई
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दत्त मंदिराजवळील गटारी तुडुंब भरल्याने येथील महिलांनी हातात पावडी घेवून गटार साफ केली. गटारी पुन्हा तुडुंब होऊ नये यासाठी सर्वांनी कचरा टोपलीत भरून फेकून दिला. दरम्यान, आता ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देवून गटारींची नियमित स्वच्छता करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मयूरी भामरे यांना क्रीडा पुरस्कार
शिरपूर : तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलमधील प्रशिक्षक मयूरी भामरे यांना क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचे वितरण २३ रोजी नाशिक येथे होणार आहे.
भाजीविक्रेत्यांना ओटे बांधून द्यावे
धुळे : येथील जुन्या जिल्हा रुग्णाललयाजवळील रस्त्यालगत भाजीविक्रेते व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. या विक्रेत्यांना रुग्णालयाच्या भिंतीलगतच ओेटे बांधून दिल्यास ते विक्रेते रस्त्यावर ठाण मांडणार नाहीत.
संतोषीमाता चौकात डांबरीकरण करावे
धुळे : शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या संतोषीमाता चौकात पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने, खडी टाकलेली होती. मात्र, या खडीमुळे वाहने पंक्चर होऊ लागली असून येथे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे.
ग्रामीण भागात धोकादायक वाहतूक सुरू
शिरपूर : लॅाकडाऊननंतर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. मात्र, या प्रवासी गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात येतात. दुर्गम भागात तर अक्षरश: गाडीच्या बोनेटवरही प्रवासी बसवून धोेकादायक वाहतूक करण्यात येते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावाचे अंतर दर्शविणाऱ्या खुणा लावा
फागणे : फागणे ते अमळनेरदरम्यान रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यालगत असलेले गावाचे अंतर दर्शविणाऱ्या खुणा काढून टाकल्या होत्या. आता रस्ता पूर्ण झाला तरी या खुणा लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावाचे अंतर समजण्यास अडचण होते.