सुराय रस्त्यावरील वाहतूक बनली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:15 IST2019-11-10T13:15:10+5:302019-11-10T13:15:59+5:30
नाल्यावरील पुल वाहून गेला । अपघाताचा धोका; उपाय योजनेकडे दुर्लक्ष

dhule
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर, सुराय, चुडाण,े अक्कलकोस, खदर्,े विखरण, मेथी, वरझडी या बहुतांश गावांना सोयीचा ठरणारा सुराय रस्त्यावरील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल समोरील नाल्या वरील पुलाचा कठडा पहिल्याच पावसात तुटून गेला असुन अद्याप तेथे कुठलीही उपाययोजना होत नसल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे.
या रस्त्यावरून दररोज मोठी वाहतूक असते. वाहन ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात घडून जीवास मुकावे लागेल, अशी परिस्थिती येथे आहे. जवळच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल असून या विद्यार्थ्यांची तसेच सुराय गावाहून येथे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सायकलवरुन शिक्षणासाठी दररोज ये -जा करत असतात.
अशावेळी समोरुन वाहन आल्यास येथे विरुद्ध पुढे जाण्याचे खुप धोक्याचे झाले आहे. हे जणू अपघाताला निमंत्रण असल्यामुळे येथे त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
शेतमाल वाहतुकीला देखील सुरुवात झाली असून वजनदार वाहने देखील या रस्त्यावरून सध्या जात आहेत. परंतू २२ जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे पूल तुटला असून अद्याप तसाच आहे. रस्ताच्या व पुलाच्या दुरुस्तीसाठी संबधित यंत्रणांमार्फत दखलच घेतली गेली नाही. यामुळे प्रवांशासह शेतकरी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या सर्वांच्या सुविधेसाठी या पुलाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आता विवाह समारंभांना देखील सुरुवात होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. किमान तात्पुरते स्वरुपात दुरुस्ती करावी, अशी मागणी युवराज सावंत, रणधीर जाधव, रवींद्र पाटील, समाधान पवार, नामदेव माळी आदींनी केली आहे.