घंटागाड्यांमुळे ‘ट्रॅफिक जॅम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:45 IST2019-11-12T11:44:08+5:302019-11-12T11:45:05+5:30
भारनियमनाचा फटका : वजन करण्यासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या रस्त्यावर

dhule
धुळे : शहरातून संकलन केलेल्या ओला व सुका कचरा मोजण्यासाठी वरखेडी कचरा डेपोवर वचनकाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र सोमवारी भारनियमनामुळे घंटागाड्यासह ट्रॅक्टर अशी ९५ वाहनांची रांग लागल्याने वरखेडी रस्त्यावर ‘ट्रॅफिक जॅम’ झाला होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह मजुरांना अडचणीचा सामना करावा लागला.
शहरातील वरखेडी रोडवर १० एकर विस्तीर्ण जागेत ७० वर्षांपूर्वी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे़ नगरपालिका असताना तयार करण्यात आलेला हा डेपो महानगरपालिका होऊन बारा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कायम आहे़ या ठिकाणी वर्षानुवर्षांपासून टाकण्यात येत असलेला कचरा आजच्या स्थितीत नेमका किती असावा हे सांगणेदेखील अवघड आहे़
वाहतूक पुर्णपणे बंद
शहरातून गोळा केलेला कचरा मोजण्यासाठी वरखेडी कचरा डेपोवर मनपाने वजन काट्याची व्यवस्था केली आहे़ याठिकाणी भारनियमनामुळे सकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठा नसल्याने येथील कचरा मोजणारा वजन काटा बंद होता. त्यामुळे सकाळी शहरातील विविध भागातून कचरा गोळा करुन आलेल्या घंटागाडया व ट्रॅक्टर त्याठिकाणी रांग लावून उभे होते. याठिकाणी ७९ घंटागाड्या, २० ट्रॅक्टर नेहमीप्रमाणे कचरा घेऊन आल्या होत्या. कचरा डेपोवरील वजन काटा बंद असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. याठिकाणी सकाळी ११ वाजता सुमारे ९५ वाहनासह २०० ते २५० चालक व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. शेवटी महापालिकेच्या कर्मचाºयांनी दुपारी १२ वाजता जनरेटरव्दारे वजन काटा झाल्याने वाहतूकीसाठी हा रस्ता मोकळा झाला़
शेतकºयांना समस्या
वरखेडी रोडवरील वाहतूक सुमारे दोन ते तीन तास खोळंबली होती. त्यामुळे परिसरातील शेतातील शेती कामे खोळंबली होती. या कचरा डेपोवरील कचरा हा अनेकदा ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर येतो. या कचºयामुळे परिसरातील कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही दिवसेदिवस बिकट होत चालला आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे मनाप प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसते.