रुढी परंपरेला तिलांजली देत घडवून आणला पुर्नविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:31 IST2020-02-23T13:30:42+5:302020-02-23T13:31:14+5:30
संडे अँकर । घटस्फोटीता वधु तºहाडीची तर अविवाहीत वर नंदुरबार तालुक्यातील वावद येथील

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
तºहाडी : जुन्या चालीरीती व रुढी परंपरेला तिलांजली देत पाटील समाजातील घटस्फोटीत महिलेचा घडवून आणला आदर्श पुर्नविवाह १८ फेब्रुवारी रोजी शहादा तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले प्रकाशा मंगल कार्यालयात येथे पार पडला.
या विवाहाप्रसंगी तºहाडीचे माजी उपसरपंच आशोक मंगा सोनवणे, माजी सरपंच सुदाम नथ्थु भलकार, तºहाडीच्या लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर, उपसरपंच गणेश नथा भामरे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य ओंकार दशरथ पाटील यांची महत्त्वाची भुमिका राहील्याने त्यांचे धुळे, नदुरबार, जळगाव खान्देशातील जिल्ह्यातून व परिसरात व पाटील समाज संघटनेकडून कौतुक होत आहे.
शिरपूर तालुक्यातील तºहाडी येथील सुभाष तुकाराम भामरे यांची कन्या यामिनी (बी.ए. इंग्रजी) हिचा वावद ता.नदुरबार जिल्हा नदुरबार येथील शेतकरी लोटन महादु पाटील यांचा मुलगा दिनानाथ (अविवाहित) (ग्रा.प .संगणक परिचालक) यांच्याशी हा विवाह प्रकाशा येथे पार पडला. वर दिनानाथ हा कामानिमित्त वावद येथे ग्रामपंचायत संगणक परिचालक आहे, तर वधु यामिनी (घटस्फोटीत) पदवीधर आहे. या विवाहात अनेक अनिष्ठ, रूढी व चालीरितींना फाटा देत एकाच दिवशी साखरपुडा, हळद व लग्न असा हा आदर्श विवाह पार पडला, विवाहात सर्वच गोष्टी वाटाघाटी करत झाल्या, त्त्यात लग्नाचा बस्ता एकमेकांनी स्वतंत्र काढून घेतला. अन्नदानाचा खर्च वधुकडील, तर इतर खर्च वर पक्षाकडे अशाप्रकारे सामंजस्य राखून हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे यामिनीला सहा वर्षाची मुलगी (मधुरा) आहे. मधुराला खरोखरीच वडिलांची गरज असताना दिनानाथच्या रुपाने वडील भेटले. तीचे पालन पोशण पालकत्व दिनानाथ यांनी स्वीकारले आहे. विवाहप्रसंगी युवराज जाधव, सुनील पाकळे तुळशीराम भामरे, प्रतापसिंग गिरासे पोलीस पाटील, अनिल भामरे, प्रविण भामरे, सोपान भामरे, साहेबराव भामरे, सुभाष भामरे, सुधीर भामरे उपस्थित होते.