व्यापाऱ्यांवरील हल्याच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:24 IST2019-12-18T23:24:10+5:302019-12-18T23:24:35+5:30
मागणी : व्यापारी संघटनेचे निदर्शने

Dhule
धुळे : गेल्या काही दिवसापासून शहरात व्यापाऱ्यांवर भरदिवसा हल्ले होऊन लुटीच्या घटना घडत आहे़ त्यामुळे व्यापाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ हा प्रकार तत्काळ थांबवावा अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा असोसिएशन आॅफ बिझनेस अॅण्ड कॉमर्स संघटने देण्यात आला़
शहरातील व्यापारी नंदकिशोर वेडू सोनवणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केला़ यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील दीड लाख रूपये लूटून नेले़ दरोडेखोरांशी प्रतिकार करतांना नंदू सोनवणे यांच्या हाताच्या बोटांना जबर जख्मा झाल्या आहेत़ या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्हा प्रशासनाने घटनेची दखल घेऊन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळाव्या, व्यापारी मनोज जैन, दिलीप अग्रवाल, कमल गुप्ता, संजय बरडीया यांच्यावरील झालेल्या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात यावे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा असोसिएशन आॅफ बिझनेस अॅण्ड कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी दिला आहे़ यावेळी सुधाकर पाचपूते, किशोर गिंदोडीया, गोकुळ बधान, सुनील रूणवाल, राजू खंडेलवाल आदीसह व्यापारी उपस्थित होते़