हनुमान जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 19:14 IST2019-04-19T19:14:13+5:302019-04-19T19:14:43+5:30

रामरक्षाचे पठन : महाप्रसादाचेही होणार वाटप

Today's program for Hanuman Jayanti | हनुमान जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

dhule

ठळक मुद्देdhule

धुळे : हनुमान जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरातील विविध हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे़ मंदिराची सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महाप्रसादाचेही वाटप होणार आहे़ 
गल्ली नंबर सहा, धुळे
गल्ली नंबर सहामधील कै़ बन्सीलाल मुंदडा चौकात श्रीमंत मारोती मंदिर ट्रस्ट आणि श्री राणा प्रताप मंडळाच्यावतीने शुक्रवार १९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे़ भाविकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले़ 
शिवाजी नगर, धुळे
हनुमान जयंतीनिमित्त शुक्रवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शिवाजी नगर, मारोती मंदिर, धुळे या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप होईल़ सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक छोटू थोरात, संदीप सरग आणि शिवाजी नगर मित्र मंडळ यांनी केले आहे़ 
दरम्यान, जीटीपी स्टॉप येथील मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता भंडाºयाचे वाटप होईल़ याशिवाय, रोकडो हनुमान मंदिरात मोठा उत्सव होणार आहे़ याशिवाय ठिकठिकाणी होणाºया हनुमान मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत़ मंदिराची सजावट पुर्णत्वास आली आहे़ 
 

Web Title: Today's program for Hanuman Jayanti

टॅग्स :Dhuleधुळे