आजपासुन ‘अंधारातून प्रकाशाकडे’ राज्य माेहीम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:41+5:302021-01-23T04:36:41+5:30
धुळे : जमाअते इस्लामी हिंदतर्फे दिनांक २२ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ही राज्यव्यापी माेहीम राबविण्यात येणार आहे. ...

आजपासुन ‘अंधारातून प्रकाशाकडे’ राज्य माेहीम राबविणार
धुळे : जमाअते इस्लामी हिंदतर्फे दिनांक २२ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ही राज्यव्यापी माेहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यभरात ८०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जमाअते इस्लामी हिंदचे सदस्य प्रा. वाजिद अली खान यांनी दिली.
काेविडच्या काळात लाेकांमध्ये आध्यात्मिक ओढ निर्माण झाली आहे. काेराेनाच्या छायेत शारीरिक अंतर पाळताना, समाजाला महामारीमुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रात पसरलेला अंधार कसा दूर करता येईल, उज्ज्वल वर्तमान व भविष्यासाठी अखंड प्रकाश कसा तेजाेमय राहील, हा संदेश या मोहिमेद्वारे पाेहाेचविण्याचा उद्देश आहे. ही राज्यव्यापी मोहीम आपल्या समाजाला अज्ञानता, घृणा व भाैतिकवादाच्या अंध:कारातून वाचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. सर्वांपर्यंत ज्ञान, समजूतदारपणा आणि आध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने जमाअते इस्लामी हिंदने राज्यभरात हे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यात पत्रकार परिषद, फाेल्डर्स वाटप, हाेर्डिंग्स व बॅनर्स लावणे, स्टिकर लावणे, जमाअते इस्लामी हिंदच्या पदाधिकाऱ्यांचे दाैरे, ५० नागरिकांच्या उपस्थितीत बैठका, लाेगाे मास्क, लाेगाे टी-शर्ट, मशीद परिचय, टी-पार्टीज, प्रीतीभाेजन आदी माध्यमातून जनतेपर्यंत या अभियानातून पाेहाेचण्याचा जमाअते इस्लामी हिंदचा प्रयत्न राहणार सअल्याची माहिती प्रा. वाजिद अली खान यांनी दिली. त्यानुसार धुळे शहरातही काही कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यात विविध धर्मगुरूंच्या बैठका, प्राध्यापकांपर्यंत हा संदेश पाेहाेचणे आणि इतर कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येईल. तर या माेहिमेचा समाराेप ३१ जानेवारी राेजी गुरुद्वारात होणार असल्याची माहिती या अभियानाचे समन्वयक अझर हुसैन यांनी दिली. यावेळी जिल्हा संघटक फिराेज अहमद आझमी, जिल्हाध्यक्ष अब्दल रऊफ शेख आदी उपस्थित हाेते.