आजपासून बाजार समिती बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:55 IST2020-04-01T21:54:37+5:302020-04-01T21:55:04+5:30
भाजीपाला टंचाईची शक्यता : कांदा, धान्य, भाजीपाला पडून, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गुरूवारपासून अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात धुळे शहराला भाजीपाल्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे़
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच शेतकºयांसह व्यापाºयांचे नुकसान टाळण्यासाठी गुरूवारपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दिली़
कोरोना विषाणूची भिती असली तरी शेतकºयांच्या शेतीमालाचे नुकसान होवू नये यासाठी बाजार समिती सुरू होती़ सोमवारी कांद्याची तब्बल १५ हजार गोण्या, पन्नास ते साठ ट्रक मोठ्या प्रमाणात आवक झाली़ परंतु कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी ट्रकचालक अव्वाच्या सव्वा दर मागत आहेत़ त्यामुळे कांद्याचा तब्बल दहा ट्रक माल पडून आहे़ तसेच भाजीपाल्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात आहे़ परंतु पोलिस प्रशासनाने दुचाकी वाहने बंद केल्याने तसेच तहसिलदारांसह महानगरपालिकेने देखील भाजीपाला विक्रेत्यांना पास देणे बंद केल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांचा माल पडून आहे़ ढोबळी मिरची फेकण्याची वेळ आली तर इतर भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाला़ धान्याची आवकही आहे़ परंतु व्यापाºयांनी खरेदी केलेला माल बाहेर जाणे बंद असल्याने धान्याचा मोठा साठा पडून आहे़ अशा परिस्थितीत शेतकºयांसह व्यापाºयांचे देखील नुकसान होत आहे़ हमाल मापाडी बांधवांना देखील काम मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत काळासाठी बद करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला, अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली़
बाजार समिती बंद राहणार असल्याने कडधान्यासह सर्वच वस्तुंची आवक बंद होईल़ परंतु भाजीपाल्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो़ कारण भाजीपाल्याची आवक बंद झाली तर किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला मिळणार नाही आणि घरपोच भाजीपाला मिळणे देखील बंद होईल़ या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागू शकते़