जिल्हा न्यायालयात तंबाखू विरोधाची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:39 IST2019-06-13T21:39:31+5:302019-06-13T21:39:51+5:30

जिल्हा न्यायालयात तंबाखू विरोधाची शपथ घेतांना डावीकडून डॉ. नितीन पाटील, डी.जी. पाटील, एम.एम.भिसे आदी

Tobacco Opposition Sworn In District Court | जिल्हा न्यायालयात तंबाखू विरोधाची घेतली शपथ

dhule


धुळे : जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे जिल्हा सत्र न्यायालय येथे तंबाखू नकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली. 
मनपाचे क्षयरोग अधिकारी डॉ. जे.सी.पाटील यांनी तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे शरिरावर होणाºया परिणामांची माहिती दिली. तर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष डी.जी.पाटील यांनी तंबाखू सेवन टाळणे, प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती दिली. 
यावेळी उपस्थितांपैकी ७६ जणांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. 
यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष एम.एम. भिसे, आर. व्ही.चव्हाण, डॉ. जे.सी.पाटील, राष्टÑीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन पाटील, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

Web Title: Tobacco Opposition Sworn In District Court

टॅग्स :Dhuleधुळे