मुलाच्या जाचाला कंटाळून बापानेच केला खून

By देवेंद्र पाठक | Updated: April 25, 2023 21:48 IST2023-04-25T21:48:04+5:302023-04-25T21:48:21+5:30

पिंपळनेर : मुलाच्या जाचाला कंटाळून लाकडी धुपाटण्याने मुलाच्या डोक्यात वार करून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाचा खून केला. ही घटना ...

Tired of the torture of the son, the father committed the murder | मुलाच्या जाचाला कंटाळून बापानेच केला खून

मुलाच्या जाचाला कंटाळून बापानेच केला खून

पिंपळनेर : मुलाच्या जाचाला कंटाळून लाकडी धुपाटण्याने मुलाच्या डोक्यात वार करून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाचा खून केला. ही घटना साक्री तालुक्यातील बसरावळ येथे सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ईलमजी रामा कुवर (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंपळनेर पोलिसांनी संशयित रामा धुळ्या कुवर (वय ४७) याला ताब्यात घेतले आहे.

साक्री तालुक्यातील बसरावळ येथील रामा कुवर हा आपल्या परिवारासाेबत वास्तव्यास आहे. त्याचा मुलगा ईलमजी याला दारुचे व्यसन आहे. दारु पिऊन आल्यानंतर तो वडिलांना नेहमी त्रास देत असायचा. माझ्यासाठी तुम्ही काय कमावून ठेवले आहे, तुम्ही मला काय दिले आहे असा जाब त्याने विचारला. या जाचाला कंटाळून त्याचे वडील रामा कुवर हे बाहेर निघून गेले होते. थोड्या वेळाने आल्यानंतर पुन्हा त्याने वडिलांवर आरोप करण्यास सुरुवात केली. अशातच चुलीतील जळते लाकूड उचलून वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे रामा कुवर याने लाकडी धुपाटणे हातात घेऊन मुलावर हल्ला चढविला. डोक्यासह कानाला, डोळ्याजवळ, हाताला जबर मारहाण केल्याने यात त्याचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. गंभीर अवस्थेत ईलमजी कुवर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. ही बाब मंगळवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात संशयित रामा कुवर याच्या विराोधात पत्नी निमा रामा कुवर हिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित रामा धुळ्या कुवर (वय ४७) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित रामा कुवर याला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे हे करीत आहेत.

Web Title: Tired of the torture of the son, the father committed the murder

टॅग्स :Dhuleधुळे