मुलीसाठी स्थळ बघून परतत असताना काळाचा घाला

By Admin | Updated: May 9, 2017 00:31 IST2017-05-09T00:31:08+5:302017-05-09T00:31:08+5:30

तिघे एकाच कुटुंबातील : घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा

The time was lost when looking for a girl for the girl | मुलीसाठी स्थळ बघून परतत असताना काळाचा घाला

मुलीसाठी स्थळ बघून परतत असताना काळाचा घाला

धुळे : मुलीला स्थळ बघून घराकडे परतत असताना शेख कुटुंबावर काळाने छडप घातली़ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर व्हॅन आदळल्याने झालेल्या अपघातात कुटुंबातील तिघे ठार झाल़े घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा पसरली आह़े
धुळे शहरातील बारापत्थर चौकातील बिस्ती गल्लीत शेख युसूफ शेख नथ्थू राहतात़ त्यांचा मोठा परिवार असून ते एकत्र राहतात़ कुटुंबातील प्रमुख हाजी शेख युसूफ शेख नथ्थू  (वय 75) हे व त्यांची मुले दोरखंड व्यापारी आहेत़ त्यांचे पाचकंदील येथे दुकान आह़े हाजी शेख यांच्या मुलीचा विवाह करावयाचा असल्याने ते कुटुंबातील सहा जणासह मुलीला स्थळ  पाहण्यासाठी सोमवारी सकाळी व्हॅनने (क्ऱ एमएच  17-ए़ई 2018) पिंपळनेर येथे गेले होत़े कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री धुळ्याकडे येण्यास निघाले होत़े रात्री 11़30 वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत महामार्गावरील इच्छापूर शिवारात नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली भररस्त्यावर उभी होती़ अंधारामुळे व्हॅनचालक शेख आसिफ शेख युसूफ यांना ट्रॅक्टर ट्रॉली  दिसली नाही़ त्यामुळे भरधाव व्हॅन त्यावर धडक दिली़ त्यात शेख युसूफ शेख नथ्थू, त्यांचा मुलगा शेख आसिफ शेख युसूफ व लहान सून साजनबी शेख असलम हे जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाल़े
घटनेमुळे शोककळा
अपघातात एकाच कुटुंबातील हाजी शेख, त्यांचा मुलगा व सून ठार झाले आहेत़ त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आह़े घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा पसरली आह़े
तिघांवर दफनविधी
 अपघातातील तिघांचे मृतदेह सकाळी त्यांच्या घरी आणण्यात आल़े दुपारी सुमारे 12 वाजता त्यांचा सोना कब्रस्थान येथे एकाच वेळी दफनविधी करण्यात आला़

Web Title: The time was lost when looking for a girl for the girl