शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या रसायन उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणी शुक्रवारी तीन संशयित पोलिसांना शरण आले़ त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करुन त्यांना अटक करण्यात आली़ अटक केलेल्या संशयितांमध्ये रुमित केमिसिंथचे संचालक संजय बाबुराव वाघ (६२, रा. नाशिक), साईट इंचार्ज गणेश भानुदास वाघ (३६, रा. अमळनेर) व जनरल मॅनेजर अनिल केशव महाजन (५२, रा. बºहाणपूर, ह.मु. शिरपूर) यांचा समावेश आहे.३१ आॅगस्टला रुमित केमिसिंथमध्ये स्फोट झाल्याने १४ कामगार ठार तर ७० जणं जखमी झाले होते. शिरपूर पोलिस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून संशयित फरार होते. शुक्रवारी संशयित स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाले. सकाळी त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.
वाघाडी स्फोट प्रकरणी तिघे पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:17 IST