तीन पोलिसांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

By Admin | Updated: February 25, 2017 23:59 IST2017-02-25T23:59:59+5:302017-02-25T23:59:59+5:30

नंदुरबार : पोलीस कोठडीतील संशयितास बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर शहर पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three offenses against the police are finally filed | तीन पोलिसांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

तीन पोलिसांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

नंदुरबार : पोलीस कोठडीतील संशयितास बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर शहर पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार योगेश मोरे, योगेश लोंढे व रवींद्र कुवर या तीन पोलीस कर्मचाºयांची नावे आहेत.
शहरात दोन गटात मारहाण झाली होती.  याप्रकरणी गुन्ह्यातील संशयित महेश मराठे यास  मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण तापले होते. पोलीस कोठडीत असताना शहर पोलीस निरीक्षकांच्या दालनात मारहाण  करण्यात आली होती. आॅपरेशन झालेले असताना व तसे सांगूनही संबंधित अधिकारी व पोलिसांनी संशयित प्रवीण महेश मराठे यास लाकडी दांडा आणि चामडी पट्ट्याने मारले होते. त्याने न्यायालयात यासंदर्भात तक्रार केली होती. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी याबाबत चौकशी करून संबधित पोलीस कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार  योगेश मोरे, योगेश लोंढे व रवींद्र कुवर या तीन पोलीस कर्मचाºयांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three offenses against the police are finally filed