तीन अल्पवयीन चोर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 22:34 IST2021-01-06T22:34:14+5:302021-01-06T22:34:33+5:30

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिलांची निदर्शने

Three minor thieves caught | तीन अल्पवयीन चोर पकडले

तीन अल्पवयीन चोर पकडले

धुळे : येथील देवपूर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान तीन अल्पवयीन चोरांना पकडले असून त्यांच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथे देवपूरातील स्वामी नारायण मंदिराच्या बाहेरुन धमाणे येथील सोपान भिला मोरे यांची दुचाकी २४ डिसेंबर रोजी सकाळी चोरीला गेली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तीन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता स्वामी नारायण मंदिरासह शहरात इतर ठिकाणी चोरलेल्या दुचाकींचीही त्यांनी कबुली दिली. त्यानुसार विविध कंपनीच्या १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उप निरीक्षक लोकेश पवार, हवालदार जब्बार शेख, पोलीस नाईक शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार सावळे, विनोद अखडमल, सागर सूर्यवंशी, निखील काटकर यांच्या पथकाने केली.
संबंधितांनी दुचाकी घेवून जाण्याचे आवाहन केले पोलिसांनी केले आहे.

Web Title: Three minor thieves caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे