तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, 6 जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: January 8, 2017 23:37 IST2017-01-08T23:37:16+5:302017-01-08T23:37:16+5:30

धुळे : नोकरीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे म्हणून शहरातील विवाहितेचा सासरी मुंब्रा येथे छळ करण्यात आला़

Three lakhs for marriage, torture against 6 | तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, 6 जणांविरुद्ध गुन्हा

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, 6 जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : नोकरीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे म्हणून शहरातील विवाहितेचा सासरी मुंब्रा येथे छळ करण्यात आला़ याप्रकरणी सहा जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े
माधुरी आकाश काळे (वय 22, रा़साने गुरुजी हौसिंग सोसायटी, धुळे) या विवाहितेचा सासरी मुंब्रा (जि़ठाणे) येथे शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला़ तिच्या अंगावरील दागिने काढून घेतल़े तसेच तिला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ जीवे मारण्याची धमकी दिली़  हा प्रकार 22 एप्रिल 2015 ते 29 डिसेंबर 2016 दरम्यान घडला़
याप्रकरणी माधुरी काळे या विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती आकाश गोपाळ काळे, सासरे गोपाळ रामकृष्ण काळे, सासू अनिता गोपाळ काळे, दीर अनिल गोपाळ काळे, नणंद काजल सनी पवार, सुनीता अशोक सोनवणे सर्व (रा़मुंब्रा) यांच्याविरुध्द भादंवि कलम 498 (अ), 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही़व्ही़ महाले करीत आहेत़

Web Title: Three lakhs for marriage, torture against 6