साक्रीजवळ अपघात तीन ठार, तीन जखमी

By Admin | Updated: May 8, 2017 12:31 IST2017-05-08T12:31:18+5:302017-05-08T12:31:18+5:30

इच्छापूरजवळील घटना. मयत व जखमी धुळ्यातील

Three killed and three injured in accident near Sakri | साक्रीजवळ अपघात तीन ठार, तीन जखमी

साक्रीजवळ अपघात तीन ठार, तीन जखमी

 साक्री ,जि.धुळे, दि.8- तालुक्यातील इच्छापूरजवळ सोमवारी पहाटे तीन वाजता व्हॅन ही रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जाऊन धडकली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर उर्वरित तीन हे जखमी झाले आहे. जखमींवर साक्री रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास धुळ्याकडून सुरतकडे जाणा:या एम.एच.17 एई 2018 क्रमांकाची व्हॅनही रस्त्यालगत उभ्या असलेल्या एम.एच.18 एन 2854 क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन धडकली. अपघातात व्हॅनमधील युसूफ शेख नथ्थू (वय 75) रा.बिस्ती गल्ली बारा पत्थर धुळे, शेख आसीफ शेख युसूफ (वय 49) आणि साजनबी शेख असलम (वय 40) रा.जुने नाका वडजाई रोड धुळे हे जागीच ठार झाले. तर शेख नसीर शेख गुलाब (वय 70)  व शेख आबेदाबी शेख नसीर (वय 65) दोन्ही रा. तिरंगा चौक, धुळे, शेख निजार सुलमान शेख आसीफ (वय 40) रा.बिस्ती गल्ली नंबर दोन, बारा पत्थर धुळे हे तीन जण जखमी झाले आहे. 

Web Title: Three killed and three injured in accident near Sakri