तीन तासात ३३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:52 IST2017-09-27T11:30:40+5:302017-09-27T12:52:29+5:30

डीपीडीसी निवडणूक : ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात

In three hours, 33 percent voting | तीन तासात ३३ टक्के मतदान

तीन तासात ३३ टक्के मतदान

ठळक मुद्देसकाळी ११ वाजेपर्यंत ग्रामीण मतदार संघातील ५६ मतदारांपैकी ४० मतदारांनी मतदान केले. लहान नागरी मतदार संघातील ५६ मतदारांपैकी केवळ ३ मतदारांनी मतदान केले. उर्वरीत नगरपंचायत मतदार संघाच्या ३४ मतदारांपैकी केवळ ६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) ८ जागांसाठी सकाळी आठ ते ११ या तीन तासात ३३ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. 
सन २०११ च्या वाढीव लोकसंख्येनुसार डीपीडीसीच्या वाढीव ८ तर  दोंडाईचा नगरपालिकेतील एका सदस्याची रिक्त असलेली १ अशा एकूण ९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, मोठ्या नागरी गटातील एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे  उर्वरीत ८ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. 
१४६ पैकी ४९ मतदारांनी बजावला हक्क 
डीपीडीच्या ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदार त्यांच्या निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. पैकी सकाळी अकरा वाजेपर्यंत ४९ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. 

Web Title: In three hours, 33 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.