आठ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाबमधील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:45 IST2020-12-23T21:45:36+5:302020-12-23T21:45:48+5:30

शिरपूर : पंजाब येथील तीन संशयिताना मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेभागालगत आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, १५ हजार रोख रक्कमसह ...

Three arrested in Punjab carrying eight pistols | आठ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाबमधील तिघे जेरबंद

आठ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाबमधील तिघे जेरबंद

शिरपूर : पंजाब येथील तीन संशयिताना मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेभागालगत आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, १५ हजार रोख रक्कमसह पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तीनही संशयिताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास केली.
पंजाब राज्यातून काही संशयित हे अग्निशस्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. लागलीच पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलीस पथकाने महाराष्ट्र - मध प्रदेश सीमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजूकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची कार येताना दिसली. सदर कारचा संशय आल्याने कार थांबविण्यात आली. या कारमध्ये बसलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये आठ देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळून आले.
पकडलेल्या संशयितांमध्ये सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शीख (२१, रा. बुलेरीयन, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (२३, रा़ कोटईशिका, ता. धरमकोट, जि. मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (३०, रा. गुरु तेगबहाद्दर नगर, पंजाब) या तिघांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीतून आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, ३ मोबाइल व १५ हजार रोख व कार असा एकूण पाच लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत तिघांना अटक केली आहे. जप्त केलेले पिस्तूल हे वरला, जि.बडवाणी, मध्य प्रदेश येथून राजूनामक व्यक्तीकडून खरेदी केले असून, हे पिस्तूल पंजाब येथे स्वत:करिता बाळगण्यासाठी नेणार असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested in Punjab carrying eight pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.