संशयिताच्या कुटूंबाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:16 IST2020-07-21T22:16:10+5:302020-07-21T22:16:30+5:30

मोहाडी खून प्रकरण : भादा कुटूंबाची संरक्षणाची मागणी

Threatening the suspect's family | संशयिताच्या कुटूंबाला धमकी

dhule

धुळे : मोहाडी उपनगर परिसरात झालेल्या खूनातील संशयिताच्या कुटूंबियांना धमकी दिली जात असून भादा कुटूंबियांनी संरक्षणाची मागणी केली आहे़
गेल्या आठवड्यात राहुल मिंड या तरुणाचा खून झाला होता़ या खूनातील संशयिताच्या कुटूंबाला गाव सोडून जाण्यासाठी रात्री अपरात्री घरी येवू धमक्या दिल्या जात आहेत़ आमचा मुलगा दोषी असेल तर त्याला खुशाल शिक्षा द्या़ परंतु संपूर्ण कुटूंबाला त्रास देवू नका अशी भावना संशयिताच्या आईने व्यक्त केली़
मयत राहुल मिंड गँगचे भैय्या मिंड, मयुर अठवडे वनम्या, सागर धुमाळ, सूरज जाधव यांच्यावर कारवाई करावी आणि कुटूंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी वरसातकौर मिलनसिंग भादा यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

Web Title: Threatening the suspect's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे