गव्हाला आग लागल्याने हजारो रूपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:08 IST2020-04-13T22:07:51+5:302020-04-13T22:08:11+5:30
परसमाळ येथील घटना : ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली

गव्हाला आग लागल्याने हजारो रूपयांचे नुकसान
शिंदखेडा :तालुक्यातील परसमाळ येथे गव्हाला आग लागून सुमारे ३० क्विंटल गहू खाक झाल्याने शेतकऱ्याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले.
परसामाळ येथील शेतकरी महेंद्र धनसिंग गिरासे यांचे परसामळ हद्दीत शेत असून तेथे गव्हाचे पीक टाकले होते. े शुक्रवारी दुपारी गव्हाच्या राशीला अचानक आग लागली. त्यात सुमारे ३० क्विंटल गव्हाचे सुमारे ४० ते ५० हजाराचे नुकसान झाले. अग्निशमन दल व पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र आजूबाजूचे शेत ओले असल्याने अग्निशमन दलाचा बंब शेतात येऊ शकला नाही. यावेळी सरपंच नारायण गिरासे, पोलीस पाटील कृष्णा करंकाळ, साहेबराव गिरासे, कैलास गिरासे, संदीप गिरासे केदार गिरासे, पंकज गिरासे, यांनी आग आटोक्यात आणली.