प्रतापपूर शिवारातून हजारोंचा कांदा लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:09+5:302021-09-15T04:42:09+5:30
याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते १३ ...

प्रतापपूर शिवारातून हजारोंचा कांदा लंपास
याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्याने प्रतापपूर शिवारातील शेतात विवेक ठाकरे यांनी कांदा साठवून ठेवलेल्या कांदाचाळीच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप ताेडले. ३० किलोप्रमाणे ३० गोण्या असा एकूण ३२ हजार २५० रुपयांचा कांदा चोरट्याने चोरुन नेला आहे.
ही घटना लक्षात आल्यानंतर ठाकरे यांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही आता चोरट्याने आपली दृष्टी वळविली असल्याचे यातून समाेर आले आहे.