50 हजाराचे मोबाईल लांबविणारे चोरटे गजाआड

By Admin | Updated: May 19, 2017 13:19 IST2017-05-19T13:19:54+5:302017-05-19T13:19:54+5:30

चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांच्याकडून 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली.

Thousands of mobile phones worth 50 thousand mobile phones | 50 हजाराचे मोबाईल लांबविणारे चोरटे गजाआड

50 हजाराचे मोबाईल लांबविणारे चोरटे गजाआड

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 19 -  दोन महिन्यांपूर्वी दाखल मोबाईल चोरी प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी धुळे शहरातील चार मोबाईल चोरटय़ांना ताब्यात घेतले आहेत़ त्यात दोन जण अल्पवयीन आहेत़ चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांच्याकडून 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. 
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्या 27 मार्च रोजी  मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्यात अज्ञात चोरटय़ांनी दुचाकीचा वापर करून एकाचा मोबाईल हिसकावून नेला होता़ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व डी़ एऩ खेडकर यांच्यासह पथकाने  संशयित अजय राजू वर्मा (रा़ धुळे), राहुल काशिनाथ शेलार (रा़ धुळे) व धुळ्य़ातीलच दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल़े त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ त्यांच्या कडून एकूण 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी  (क्ऱ एमएच 18 एडी 6145) जप्त करण्यात आली आह़े
 

Web Title: Thousands of mobile phones worth 50 thousand mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.