महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्यास हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:59+5:302021-09-08T04:42:59+5:30
धुळे शहराला लागून मुंबई आग्रा आणि नागपूर सुरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यातून दर मिनीटाला एक याप्रमाणे हजारो ...

महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्यास हजाराचा दंड
धुळे शहराला लागून मुंबई आग्रा आणि नागपूर सुरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यातून दर मिनीटाला एक याप्रमाणे हजारो वाहनाची ये जा सुरु असते. त्यात पुन्हा अवजड वाहनाचा समावेश होतो. वाहनाचा वेग किती असावा त्याचे काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण, बहुतेकवेळा वाहने सुसाट वेगाने जात असतात, परिणामी अपघाताची संख्या वाढली आहे. ते रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाद्वारे वाहनाचा वेग वाढविल्यास १ हजार रुपये दंड ठोठावला जातो. तसा मॅसेज त्यांना मिळत आहे. वेगावर नियंत्रण मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न यातून दिसून येतो.
धावत्या गाडीचा
मोजला जातो वेग
महामार्गावर वाहनांचा वेग सुसाट असतो. अशावेळी वाहना अडविणे कठीण होत असते. पण, वाहने कितीही वेगाने जात असलेतरी त्यांचा वेग हा नियमांपेक्षा अधिक आहे का हे बंदुकीसारख्या यंत्राद्वारे मोजले जाते. वेग जास्त असल्यास ऑटोमॅटीक संबंधितांना दंंडाचा मॅसेज जातो. आरटीओ विभागाकडून दंड वसूल केला जातो.
एसएमएसवर
मिळते पावती
महामार्गावर वाहनांनी किती प्रमाणात आपले वाहन चालवायचे त्याचे काही धोरण आहे. पण त्याचे उल्लंघन केल्यास हजार रुपये दंडाची पावतीचा मॅसेज संबंधितांच्या मोबाईलवर धडकतो. ती रक्कम भरल्याशिवाय आरटीओ विभागाकडून वाहनांसंबंधीचे कामकाज हाेत नाही.
महामार्गावर कोणत्या
महिन्यात किती दंड
जानेवारी : ५ लाख
फेब्रुवारी : ४ लाख
मार्च : ५ लाख
एप्रिल : साडेपाच लाख
मे : ३ लाख
जून : साडेतीन लाख
जुलै : ४ लाख
ऑगस्ट : २ लाख