चितोडला घरफोडी हजारोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:21 IST2020-06-02T22:20:40+5:302020-06-02T22:21:06+5:30
पोलिसांची घरे टार्गेट : दोन ठिकाणी प्रयत्न

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथून जवळच असलेल्या चितोड गावात रेणुका नगरात सेवानिवृत्ती पोलीस कर्मचारी माधव दत्तात्रय जाधव यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये रोख, अर्धा ग्राम सोन्याचा दागिना, कागदपत्रे असा एकूण २२ हजार रुपये किंमतीचा ऐजव चोरुन नेला़
घर बंद असल्याचा गैरफायदा घेत सोमवारी रात्री ही चोरी झाली़ चोरट्यांनी कुलूप तोडून आता प्रवेश केला़ लोखंडी कपाटातील ऐवज चोरुन नेला़ याप्रकरणी माधव जाधव यांच्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान रेणुका नगरमध्ये आणखी दोन घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ पोलिसांच्या बॅण्ड पथकातील कर्मचारी दिनेश ओंकार गुरव यांच्या दरवाजाला सेफ्टी लॉक असल्याने चोरट्यांना घरात प्रवेश करता आला नाही़ याच भागात गोविंद एकनाथ पाटील यांच्या घराबाहेरची मोटारसायकल चोरण्याचाही प्रयत्न झाला़ परंतु आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले़