९५ दिवसांनंतरही बळसाण्याचे तेरावे तीर्थकरांचे मंदिर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:21 IST2020-06-22T13:20:33+5:302020-06-22T13:21:00+5:30

लॉकडाऊनचा परिणाम

Thirteenth shrine of Balsana closed even after 95 days | ९५ दिवसांनंतरही बळसाण्याचे तेरावे तीर्थकरांचे मंदिर बंद

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
बळसाणे : बळसाणे हे जैन धर्मियाचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या विमलनाथ भगवंताचे दोघी मंदिर गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून बंद आहे़ परिणामी भाविकांना दर्शनाची आस लागली आहे.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशात संचारबंदी लागू झाली़ त्यामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात भाविकांची गर्दी जमा होवू नये असे प्रशासनाचे आदेश सर्वत्र निघाल्याने येथील तीर्थक्षेत्राच्या संचालकांनी दोघी मंदिरांचे द्वार बंद करण्याचा निर्णय घेत प्रशासनास सहकार्य केले़ मात्र, दर महिन्याच्या पौर्णिमेला भाविकांची व शनिवार, रविवारी त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टीत परराज्यातील भाविकांची अलोट गर्दी बळसाणे तीर्थक्षेत्रावर जमते़ परंतु कोरोना महामारीमुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांची हिरमोड होत आहे़ महिन्याच्या पौर्णिमेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थित राहते़ पण, मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून भाविक विमलनाथ दादांच्या दर्शनापासून आलिप्त आहेत़ मंदिराची दारे कधी उघडेल हीच अपेक्षा आता तरी भाविकांना लागली आहे़ गावातील काही भक्त विमलनाथ दादांच्या जिन्याच्या शेवटच्या पायरीवर डोके टेकून दर्शन घेत आहेत़
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून शितलनाथ संस्थान संचलित विमलनाथ भगवंताचे व विश्वकल्याणातील विमलनाथ भगवंताचे मंदिरे पुजाऱ्याच्या हस्ते विधीवत पुजा आरती करुन दिवसभरासाठी मंदिर बंद राहते़ तसेच सायंकाळची आरती आटोपल्यावर मंदिरे बंद होत असल्याचे विश्वकल्याणाकाचे ट्रस्टी महावीर जैन यांनी सांगितले़ मंदिर परिसरातील भाविकांनी अक्षरश: व्यवसायात थोडा बदल केल्याचे चित्र दिसून येत आहे़ तसेच फुलांची, नारळ, पुजापत्रीची धार्मिक दुकानांची रेलचेल मंदावली आहे़
२२ मार्च पासून मंदिरे बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील व विश्वकल्याणक येथील मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि मंदिर परिसरात गर्दी होवू नये म्हणून २२ मार्च २०२० पासून प्रशासनाच्या आदेशानुसार बळसाणे तीर्थक्षेत्रावरील दोघी मंदिरे बंद करण्यात आली आहे़

Web Title: Thirteenth shrine of Balsana closed even after 95 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे